Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

निर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत !

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सात जून २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अर्थात २८ मे रोजी तेरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, संकलन गटातून विजय खोचीकर, आणि संगीत व गायक गटातून आनंद शिंदे यांचे प्रत्येकी एकेक अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोधी निवडीची केवळ घोषणा शिल्लक राहिली आहे.

निर्मात गटातील दोन जागेसाठी आठ उमेदवार आहेत. यामध्ये मानसिंग कदम, प्रकाश पाटील, महादेव शिरोळकर, भगवान मैदद्वकर, गणेश तळेकर, विजय शिंदे, मेघराज भोसले सुनील महाजन हे उमेदवार आहेत. दिग्दर्शक गटातही दोन संचालक निवडले जातील. या गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दिपक कदम, सुनील घोरपडे, अवधूत जोशी, सतीश रणदिवे, अमोल भावे, अजित शिरोळे, अमरसिंह जगदाळे, धर्मेंद यादव, विजय राणे उमेदवार आहेत. उर्वरित अन्य गटातून प्रत्येकी एक संचालक निवडून द्यायचा आहे. लेखक-कथा – पटकथा – संवाद व गीत लेखन गटात पितांबर काळे व राज काझी यांच्यामध्ये लढत आहे. स्थिर व चलत छायाचित्रण गटात धनाजी यमकर व महेश देशपांडे अशी लढत आहे. अभिनेता गटात पाच उमेदवार आहेत. आदित्य सिंघानिया, अशोक जाधव, सुशांत शेलार, संतोष शिंदे आणि आनंद काळे या उमेदवारात लढत होईल. कला दिग्दर्शक गटातील जागेसाठी सतीश बीडकर, प्रवीण शिवराम पाटील व उल्हास भालचंद्र नांद्रे अशी लढत होणार आहे. 

नृत्य दिग्दर्शक -नर्तक- नर्तिका गटात अनिल सुतार, संग्राम भालकर, सुभाष नारायण नकाशे तर ध्वनीरेखक गटात शरद चव्हाण व निलेश बुट्टे यांच्यामध्ये लढत होणार आहे.निर्मिती व्यवस्था – व्यवस्थापकीय यंत्रणा गटात मिलिंद अष्टेकर, मनोज मराठे, रविंद्र गावडे असे तीन उमेदवार आहेत. रंगभूषा -वेशभूषा व केशभूषा गटात सदांनद सुर्यवंशी, चैत्राली डोंगरे अशी दुरंगी लढत आहे. वितरण – स्टुडिओ लॅब – प्रदर्शन व प्रसिद्धी विभागात ज्येष्ठ पत्रकार शरद लोणकर, गणेश गारगोटे, प्रकाश जाधव यांच्यामध्ये लढत आहे. कामगार विभागातही रणजीत जाधव विकास तोरणे यांच्यामध्ये थेट लढत आहे. हे दोघेही कोल्हापूरचे आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading