Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

दिवस तिसरा – श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव

 

पुणे – नृत्याविष्कार आणि आशयघन नाट्याविष्कार, हे श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
बोल सखी या शीर्षकांतर्गत नृत्यांगना ऋतुजा आणि स्वरश्री यांनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्यातील मैत्रीचे बंध भरतनाट्यम आणि कथक नृत्याच्या माध्यमातून उलगडले. संघर्ष आणि सहकार्य यांचा हा प्रवास काव्य, पत्र आणि भाषेच्या आधाराने शिक्षण, एकता आणि स्त्रियांचे परस्पर सहकार्य इथपर्यंत मांडण्यात आला.
उत्तरार्धात डू यू नो धिस साॅग या नाट्याविष्काराने रसिकांना खिळवून ठेवले. हिंदी – इंग्रजी भाषेतील या दीड तासाच्या नाटकाचे सादरीकरण दिल्ली येथील मल्लिका तनेजा यांचे होते. विस्मृतीत गेलेल्या गायिकेची गतकाळ, आठवणी, सुखदुःख आणि वेदनेची ही कहाणी तिच्या आत्मशोधापर्यंत नेणारी होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading