fbpx

यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे. सदर महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. याआधीचा महोत्सव डिसेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: