टाटा संपन्नच्या नव्या कॅम्पेनची घोषणा
मुंबई : परिपूर्ण पोषण देणाऱ्या, दर्जेदार अनपॉलिश्ड डाळी, उत्तम दर्जाची कडधान्ये, ज्यातील नैसर्गिक तैल घटक तसेच्या तसे राखले गेले आहेत असे मसाले यासारखे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करवून देण्यासाठी वचनबद्ध ब्रँड टाटा संपन्नने #JaiseNatureNeBanaya हे आपले नवे कॅम्पेन सुरु करत असल्याची घोषणा आज केली. दैनंदिन भारतीय आहारामध्ये दर्जेदार पोषण असले पाहिजे याबाबत विशेष जागरूक असलेल्या ग्राहकांसाठी ‘अधिक जास्त चांगला दर्जा आणि पोषण‘ मिळवून देणारी उत्पादने सादर करण्यावर टाटा संपन्न ब्रँडने आपले लक्ष केंद्रित केले आहे, त्यांचे नवे कॅम्पेन या धोरणाला अनुसरून तयार करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या खाद्यपदार्थविषयक गरजा पूर्ण करताना त्यांना दर्जेदार पर्याय उपलब्ध व्हावेत व कोणत्याही अतिरिक्त प्रक्रिया न करता प्रत्येक खाद्यपदार्थाची पोषणात्मक शक्ती कायम राखली जावी ही ब्रँडची प्रेरणा या कॅम्पेनचा केंद्रबिंदू आहे.
एक ब्रँड म्हणून ‘टाटा संपन्न‘ असे मानतो की आपण जे अन्न खातो त्यापैकी प्रत्येक पदार्थाचे नैसर्गिक गुणधर्म असतात आणि ते गुणधर्म कायम ठेवून, त्यातून मिळणाऱ्या पोषणाविषयी जागरूक राहून जेव्हा आपण ते पदार्थ खातो तेव्हा निसर्गाची मूलभूत शक्ती आपल्या शरीराला लाभते. दिग्गज, गुणी अभिनेता मनोज वाजपेयी यांना घेऊन तयार करण्यात आलेल्या ऍड फिल्म्सच्या एका सीरिजमधून हा विचार मांडण्यात आला आहे. खाद्यपदार्थ खरेदी करत असताना आपण कशाची निवड करत आहोत यावर ग्राहकांनी पुनर्विचार करावा, मसाले, कडधान्ये कशी दिसतात यापेक्षा त्यांचा स्वाद आणि त्यापासून मिळणारे लाभ यावर लक्ष केंद्रित करावे यासाठी ग्राहकांना प्रेरित करणाऱ्या या फिल्म्स आहेत. डाळी आणि मसाल्यांमध्ये निसर्गतः अभिप्रेत असलेले सर्व गुण व लाभ प्रदान केले जावेत हे टाटा संपन्नचे ब्रँड वचन या कॅम्पेनमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्सच्या प्रेसिडेंट – पॅकेज्ड फूड्स (इंडिया) श्रीमती दीपिका भान यांनी कॅम्पेनबाबत सांगितले, “प्रत्येक भारतीय कुटुंबाला उच्च दर्जाचे पोषण मिळावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या प्रत्येक उत्पादनावर प्रक्रिया करताना त्यातील संपूर्ण पोषण क्षमता तशीच कायम राखली जाईल याबाबत जागरूक राहण्यासाठी ही वचनबद्धता आम्हाला प्रेरित करते. खाद्यपदार्थातील नैसर्गिक शक्ती कायम राखली जावी यावर आमचा सतत भर असल्यानेच आमची उत्पादने उच्च दर्जाची आहेत, शरीरातील प्रत्येक इंद्रियाला त्यांचे उत्तम लाभ मिळतात, त्यामुळे ते अतिशय स्वादिष्ट असतात. टाटा संपन्न सर्वगुण संपन्न आहे.”
टाटा संपन्न ब्रँडसोबत सहयोगाबद्दल अभिनेते मनोज वाजपेयी म्हणाले, “मी माझ्या घरी दररोज जे जेवतो ते भारतीय जेवण मला सर्वात जास्त आवडते. सिनेमातील माझ्या भूमिका असोत नाहीतर माझ्या जेवणातील पदार्थ आणि त्यासाठी वापरलेली सामग्री असो मी दर्जा व गुणवत्तेबाबत खूप जास्त जागरूक असतो. आपल्या ग्राहकांना सर्वगुण संपन्न पोषण मिळावे हा टाटा संपन्न ब्रँडचा विचार मला खूप भावला आणि आमचा हा सहयोग घडवून आणणारा सर्वात प्रमुख घटक देखील हाच आहे. माझे व्यक्तिगत मत आहे की तुमचे घरचे जेवण जर उच्च दर्जाच्या सामग्रीने बनवलेले असेल, त्यामधे भेसळ किंवा पॉलिशिंग असे काही नसेल तर त्या जेवणाचे पोषणमूल्य हे जास्तीत जास्त नैसर्गिक आणि अस्सल असते, जे तुम्हाला संपन्न पोषण मिळवून देऊ शकते.”