fbpx

आयटेलतर्फे हाय- स्पीड ४जी सह A23S ५२९९ रुपयांत लाँच

नवी दिल्ली : सर्वसामान्य लोकांना सहजपणे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयटेलने A23S हा आणखी एक प्रवर्तकीय स्मार्टफोन लाँच केला आहे. A23S चा प्रचार #TarakkiKaSathi म्हणून केला जात असून त्याच्या मदतीने किमान सुविधा असलेले फोन किंवा एंट्री- लेवल स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना केवळ ५२९९ रुपयांत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या विभागातील सर्वोत्तम उत्पादन असलेला हा फोन ग्राहकांच्या मनोरंजन, इंटरेनट बँकिंग, ई- कॉमर्स आणि सोशल मीडियासारख्या दैनंदिन डिजिटल गरजा पूर्ण करून त्यांचे आयुष्य अत्याधुनिक तंत्रज्ञान, ४जी इंटरनेट आणि कमी किंमती यांच्या मदतीने सुखकर करेल.

आयटेल A23S ने हाय- स्पीड इंटरनेट, चौफेर कनेक्टिव्हिटी, ड्युएल 4G VoLTE सपोर्ट वैशिष्ट्ये सामान्य ग्राहकाला उपलब्ध करून देत डिजिटल दरी भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याशिवाय स्मार्टफोनचे २ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे इंटर्नल स्टोअरेज (३२ जीबीपर्यंत वाढवता येण्यासारखे) यांमुळे ग्राहकाला एकाचवेळेस विविध अप्लिकेशन्स सहजपणे वापरता येतात. मोठा आणि प्रकाशमान १२.७ सेमी (५) डिस्प्ले, ३०२० एमएएच बॅटरी, नवे डिझाइन यांमुळे A23S स्मार्टफोन या विभागातील सर्वोत्तम उत्पादन ठरेल.

या लाँचविषयी इंटेल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तलापात्र म्हणाले, ‘भारतात ३०० दशलक्षांपेक्षा जास्त ग्राहक फीचर फोन वापरत असून डिजिटल फोन्सकडे वळण्याची प्रतीक्षा करत आहे, मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाहीये. आयटेलने नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या दमदार उत्पादन श्रेणीच्या मदतीने भारताच्या प्रादेशिक भागात दूरपर्यंत पोहोचत विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. A23S सह आयटेलने भारताच्या डिजिटल विकास साधण्याच्या प्रवासात मोठा हातभार लावला आहे.’

ते पुढे म्हणाले, आयटेल इंडियाने एकच उद्देश ठेवत नाविन्य आणि तंत्रज्ञान निर्मिती करण्याचे ठरवले आहे आणि ते म्हणजे, स्वप्न आणि आकांक्षांना पंख देणे, प्रेरणा देणे, तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देत ग्राहकांचे आयुष्य सही करणे.

आयटेल A23S ने भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातील भाषेचा अडसर दूर करण्याची बांधिलकी जपण्यासाठी विशेष प्रयत्न करत  १५ वेगवेगळ्या भाषा समाविष्ट केल्या आहेत. देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी या फोनमध्ये हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, पंजाबी, आसामीज, बंगाली, कन्नड, मल्याळम, काश्मिरी, उर्दू, नेपाळी, मराठी आणि ओरिया अशा १४ अतिरिक्त भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

आयटेल A23S स्काय क्यान, स्काय ब्लॅक आणि ओशन ब्लू अशा तीन अनोख्या रंगांत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहेत. या रंगांना चमकदार फिनिश, आर अँगल आणि कॅमेरा डेको डिझाइन्स यांची जोड देण्यात आल्यामुळे या उपकरणाचे रूप आणखी खुलले आहे.

नव्या स्मार्टफोनमध्ये आयटेलकडून खास सोशल टर्बो वैशिष्ट्य देण्यात आले असून त्यात व्हॉट्स अप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्टेटस सेव्ह यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटसह सर्व्हिस अश्युरन्स देण्यात आला आहे, ज्यामुळेग्राहकांना खरेदीच्या १०० दिवसांच्या आत स्क्रीन तुटल्यास एकदा मोफत बदलून दिली जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: