fbpx

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक संपन्न

पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आपण सुपरिचित असालच. विद्यार्थी हितात सातत्याने कार्यरत असलेली विद्यार्थी परिषद नेहमीच आपल्या कार्यपद्धती साठी प्रसिद्ध आहे. याच कार्यपद्धतीचा मुख्य भाग म्हणजे कार्यकारिणी बैठक. दिनांक १६ व १७ जुलै या २ दिवसांत अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक आळंदी येथे संपन्न झाली.

ज्ञान, शिल, एकता ची त्रिसूत्री हाती घेऊन विद्यार्थी हितात कार्य करताना आपले ध्येय समोर ठेवून निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. या बैठकीत, विद्यार्थी परिषदेच्या विविध आयामांची जसे की सेवार्थ विद्यार्थी, विद्यार्थी विकास मंच, राष्ट्रीय कलामंच, फार्मा व्हिजन, मेडिव्हिजन, कार्यालय, शोध, टी एस व्ही के, जिज्ञासा अशा आयामांची माहिती व आतापर्यंतच्या कार्यांचा आढावा मांडण्यात आला. सोबतच, कार्यालयीन विषयात मीडिया, सोशल मीडिया वर विद्यार्थ्यांचे कसे लक्ष असले पाहिजे. त्याच्यावर त्यांनी कसे कार्य केले पाहिजे, अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

शैक्षणिक आणि सामाजिक सद्यस्थिती वर चर्चा करून विद्यार्थी हितात असलेले २ प्रस्ताव या बैठकीत पारित करण्यात आले. तसेच, राज्य शासनाकडे पाठवण्यात आले. प्रत्येक हाताला कार्य, आणि प्रत्येक कार्याला हात अशे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थी परिषद ही नेहमी विद्यार्थी कार्यकर्त्यांना जवाबदारी देते. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र प्रदेशातील विभाग तसेच जिल्ह्यांचे नविन संयोजक घोषित करण्यात आले. जे पुढील वर्षभर विद्यार्थी हितात आपापल्या कार्यक्षेत्रात कार्य करत राहतील.

या बैठकीत अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते, प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे तसेच इतर प्रांत पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: