fbpx

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पाचव्या शोरूमचे उदघाटन

पुणे : सोने आणि हिऱ्यांच्या आभूषणांची अग्रेसर किरकोळ विक्रेता साखळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, पुणे येथे  आपले पाचवे शोरूम सुरू केले. महावीर पार्क बिल्डिंग ‘ए’सातारा रोड येथील नवीन शोरूमच्या उद्घाटनातून हे महाराष्ट्रातील तिचे १५ वे दालन साकारले आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ह्या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. या शुभारंभाप्रीत्यर्थ या शोरूममध्येराज्याच्या समृद्ध परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे विविध ब्रँडच्या नवीनतम दागिन्यांचे संग्रह प्रदर्शित करण्या आले आहेत.

जवळपास ५,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे शोरूम विविध डिझाईन्सच्या दागिन्यांचे विस्तृत संग्रह तसेच वाजवी घडणावळ शुल्कासह दागिन्यांच्या वाजवी किमती आणि ग्राहकांना खर्चलेल्या पैशाचे समर्पक मूल्य मिळेल अशा भारतातील सर्वोत्तम सोन्याचे दर प्रस्तुत करण्याचा दावा करते. सोनेहिरेमौल्यवान रत्न आणि हलक्या वजनाच्या नववधूंच्या दागिन्यांच्या कलेक्शनच्या विस्तृत श्रेणीचे प्रदर्शन करण्याव्यतिरिक्तया शोरूममध्ये महाराष्ट्रीय वधूंसाठी खास पारख केलेल्या पारंपारिक आणि समकालीन डिझाइन्सच्या नवीनतम दागिन्यांचा संग्रह ठेवण्यात आला आहे. हे शोरूम मलाबार गोल्ड आणि डायमंड्सचे एरा अनकट ज्वेलरीप्रेसिया जेमस्टोन ज्वेलरी आणि हस्तकारागिरीवर आधारीत एथनिक्स या खास डिझायनर ज्वेलरीचे सब-ब्रँड्स देखील सादर करते.

मलाबार गोल्ड आणि डायमंड्सची ग्राहकांप्रती असलेली वचनबद्धतेचा भाग म्हणून ग्राहकांना १० वचने देऊ करते. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या या १० आश्वासनांमध्ये खड्यांचे वजन, निव्वळ वजन आणि दागिन्यांतील खडे-जडावांचे शुल्क, दागिन्यांची आजीवन देखभाल, पुनर्विक्री करताना सोन्याचे १०० टक्के मूल्य दर्शविणारा पारदर्शक किंमती, जुने सोन्याचे दागिने परत घेताना एक्स्चेंजवर शून्य वजावट, सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे १०० टक्के बीआयएस हॉलमार्किंग, आयजीआय आणि जीआयए प्रमाणित हिरे जागतिक मानकांची २८ पदरी गुणवत्ता तपासणी, बायबॅक हमी, जबाबदार सोर्सिंग आणि उचित श्रम पद्धती यांचा समावेश आहे.

मलाबार समूहाचे एम. पी. अहमद म्हणाले की नवीन शोरूम्सचे अनावरण हे आमच्या ग्राहकांसाठी दागिने खरेदी अधिक सुलभ व्हावी आणि त्यांची वैविध्यपूर्ण मागणी पूर्ण करण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. पुण्यातील सातारा रोड येथील आमचे हे नवीन दालन ग्राहकांना जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव, उत्कृष्ट कारागिरी आणि प्रत्येक प्रसंगासाठी मनाजोगत्या डिझाईन्स मिळवून देईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: