बुद्ध पौर्णिमेनिमित्त तळेगावमध्ये ‘धम्म पहाट’चे आयोजन

पिंपरी : बुद्ध पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या संयुक्तपणे भीम बुद्ध गीतांच्या ‘धम्म पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 16 मे रोजी पहाटे 5.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, अँटिनो कॉलनी तळेगाव स्टेशन येथे होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व स्मारक समितीच्या अध्यक्षा ऍड. रंजना भोसले यांनी दिली. या धम्म पहाट कार्यक्रमात गायक स्वप्निल पवार, शीतल थूल आणि मधुसुदन ओझा यांचे गायन होणार आहे; तर संतोष खंडागळे, प्रवीण जाधव, चंद्रशेखर गायकवाड त्यांना संगीत साथसंगत करतील.

Leave a Reply

%d bloggers like this: