शिंपी समाजाचा वधू वर मेळावा संपन्न, १ हजार सभासदांची नोंदणी
पुणे : कोरोना महामारीनंतर प्रथमच शिंपी समाजातील सर्व पोट जातींचा एकत्रित वधू वर मेळावा महर्षिनगर येथील शिवशंकर सभागृह येथे पार पडला. मेळाव्यात महाराष्ट्रातून १ हजार सभासदांनी नोंदणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव तुपसाखरे तर प्रमुख पाहुणे अॅड. प्रताप परदेशी, मलबार गोल्डचे प्रमुख अन्वर, उद्योगपती दीपक नेवासकर, एकनाथ सदावर्ते, नितीन उत्तरकर, नामदेव समाजोन्नती परिषदेचे विश्वस्त सुभाष भांबुरे (कोल्हापूर), बाळासाहेब काकडे (सांगली) ज्ञानेश्वर पाटसकर व वसंतराव खुर्द (पुणे), कोषाध्यक्ष राजाभाऊ पोरे, बापूसो बोत्रे यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके यांच्या पुढाकाराने व संजय नेवासकर, दिलीपकुमार वायचळ व सुभाष पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याची वैशिष्ट्य म्हणजे काॅफी पे चर्चा करीता वधूवरांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. लकी ड्रॉ द्वारे पाच वधू व पाच वरांना चांदीचे नाणे मलबार गोल्ड यांचे तर्फे प्रोत्साहन पर देण्यात आले. तसेच या मेळाव्यात नोंदणी केलेल्या गरजू व गरीब कुटुंबातील वधू-वरांचे मोफत विवाह लावले जातील, अशी माहिती पुणे शहराध्यक्ष संदिप लचके यांनी दिली.
यावेळी पुणे शहराचे उपाध्यक्ष रणजित माळवदे, प्रदिप खोले, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे तसेच अक्षय मांढरे, ज्ञानेश्वर पाटेकर, स्वप्निल खुर्द, शिवाजी माळवदकर, जयंत पाटणकर, राहूल सुपेकर तर वधूवर नोंदणीसाठी प्रशांत सातपुते, विजय कालेकर, दिंगबर क्षीरसागर, रमेश हिरवे तर ऑनलाईन साठी चिन्मय निमकर, निकीता पांढरकामे, मंदार पांढरकामे यांचे सहकार्य लाभले.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, वधूवर मेळावा ही काळाची गरज असून याचा शिंपी समाजाने लाभ घ्यावा. संजीव तुपसाखरे म्हणाले की, कोरोना संकट मुक्तीनंतर समाजाने समाजासाठी घेतलेला पहिलाच वधू वर मेळावा हा सामाजिक उपक्रम आहे. प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष मुळे यांनी आभार मानले.