Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने केली पुण्यात तक्रार दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केल्या प्रकरणी टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात आता पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याआधी तिच्याविरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्याने केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही केतकीच्या कृत्यावर टीका केली. तिच्याविरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीच्या पदधिकऱ्यांनी केतकीच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने तिला अटक होण्याची शक्यता आहे.
यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading