वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी टेकडीमध्ये बोगदा उत्खनन करण्याची काय गरज आहे ? खासदार वंदना चव्हाण

पुणे: शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्प उभारण्यात आलं, उड्डाणपूल बांधण्यात आले, इलेक्ट्रिसिटी बस आणण्यात आल्या,या तिन्ही गोष्टींमुळे पुणे शहराची वाहतूक कोंडी तीस टक्क्यांनी कमी होईल, असा दावा पुणे महापालिकेनं केला होता.त्यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेताळ टेकडी आणि तळजाई टेकडीमध्ये बोगदा उत्खनन करण्याची काय गरज आहे ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार वंदना चव्हाण यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत महानगरपालिकेपुढे उपस्थित केला आहे.

वंदना चव्हाण म्हणाल्या,वेताळ टेकडीवरील भाग हा वनाच्छादित भाग असून हा भाग कोथरूड आणि प्रभात रोड भागातील नागरिकांचा रेन वॉटर हार्वेस्टिंग बँक आहे. त्याठिकाणी परत बोगदे तयार केल्यास हा रेन वाटर हार्वेस्टिंग बँक आणि वनाच्छादित भाग भविष्यात प्रभावित होईल.असा दावा देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. मुळात पुणे महानगरपालिकने ह्या तिन्ही बोगद्याच फ्री प्रॅक्टिकल प्लान तयार न करता विकास आराखडा मध्ये हे बोगदे दर्शविण्याची चूक पुणे महापालिकेने केली आहे. असाही दावा वंदना चव्हाण यांनी केला.
त्याचबरोबर पुणे शहरातील नदी सुधार प्रकल्प राबवत असताना तो तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे राबविण्यात यावा, साबरमती नदी विकासासारखा तांत्रिक पद्धतीने पुणे शहरातील नद्यांचा सुधार करण्यात येऊ नये, अशी मागणी देखील वंदना चव्हाण यांनी केली.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या (Traffic सोडविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे दोन बोगदे आणि तळजाई टेकडी येथे एक बोगदा उत्खनन करण्याचा निर्णय पुणे शहराच्या विकास आराखड्यात घेतला होता. मात्र वेताळ टेकडी आणि तळजाई टेकडी याठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोगदे तयार केल्यास पर्यावरणाचा आणि पाण्याचा मोठा ऱ्हास होईल. असा दावा वंदना चव्हाण यांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: