जाधवर नर्सिंग कॉलेजतर्फे नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन
न-हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या कॉलेज आॅफ नर्सिंग व आदित्य फाऊंडेशनचा पुढाकार
पुणे : न-हे येथील कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट कॉलेज आॅफ नर्सिंग आणि आदित्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात ११७१ जणांची तपासणी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, अनिल आठलेकर, सुरेश ब्राह्मणे, दिगंबर पेठकर, मंगेश दरेकर, दादासाहेब गुरव यांसह प्राध्यापक, पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
शिबीरात नेत्रतपासणी संदर्भात विविध चाचण्या घेण्यात आल्या. डोळ्यांच्या आजारासंदर्भात उपाययोजना देखील सांगण्यात आल्या. तसेच डोळ्यांचे आजार होऊ नये, याकरीता प्रतिबंधात्मक कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन यावेळी तज्ज्ञांनी केल्याचे अॅड.शार्दुल जाधवर यांनी सांगितले.