तरुण स्त्रियांनी परिचारिका क्षेत्र निवडावे परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शिका आशा जोशी यांचे मत

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आवाहन ; परिचारिकांकरिता दिलेल्या २५ हजार रुपये देणगीतून होणार सन्मान सोहळा

पुणे : आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा स्मरण दिन जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो. सेवेचा आनंद आणि कमाईचे समाधान हे दोन्ही परिचारिका क्षेत्रात मिळते. त्यामुळे तरुण स्त्रियांनी परिचारिका क्षेत्र निवडावे, असे मत परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शिका आशा जोशी यांनी व्यक्त केले.

कोविड काळात निष्ठेने व सेवाभावी वृतीने काम करणाऱ्या परिचारिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याकरिता आशा जोशी यांनी परिचारिका संघटनेला दिलेल्या पंचवीस हजार रुपये देणगी दिली होती. त्यातून हा सन्मान होणार आहे.

आशा जोशी म्हणाल्या, संपूर्ण जगभरात २ लाख प्रशिक्षित परिचारिकांची आरोग्य सेवांमध्ये गरज आहे. परिचारिकांना या सेवेच्या निमित्ताने परदेशी जाण्याच्या सुसंधीही मिळतात. त्यामुळे मोठया संख्येने या क्षेत्रात तरुण महिलांनी यावे.

आशा जोशी या ससून हॉस्पिटलमधीक निवृत्त अधिपरिचारिका आणि परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम करीत त्यांच्या देणगीतून सन्मान केला जाणार असल्याचे महाराष्ट्र गन्ह नर्सेस असोसिएशनच्या चिटणीस सुमन टिळेकर यांनी सांगितले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: