अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या अस्तित्वा साठी ‘मनपा सेवकांच्या’ आंदोलनास काँग्रेस’चा पाठिंबा… काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : दि ५एप्रिल २०२२ रोजी आरोग्य अधिकारी पुणे मनपा यांनी, मनपा पॅनलवर असलेल्या रुग्णालयांना पुणे मनपाच्या सी. एच. एस. अंतर्गत प्रोसिजर व तपासण्यांचे देयके अदा करण्यात येणार नाहीत असे कळवल्यामुळे, ऊपचारार्थ सेवकांना अचानक मोठा भुर्दंड सोसावा लागला तसेच काही सेवकांना आपले उपचारही थांबवावे लागले.. प्रशासनाच्या या चुकीच्या, एकतर्फी निर्णया विरोधात आज पुणे मनपा कामगार संघटनांच्या व सर्व सहयोगी संधटनांच्या वतीने धरणे – आंदोलन करण्यात आले होते..
पुणे महानगरपालिकेला लागू असलेली औषधे इ केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित आहेत, केंद्र सरकारने ज्या उपचार व प्रोसिजर ला मान्यता दिली आहे तेच आपण मान्य करून त्याची प्रतिपूर्ती आजपर्यंत करत आलेलो आहोत, फक्त सुचित त्याचा उल्लेख करणे एवढे तांत्रिक बाब होती पण त्याची पूर्तता न करता उपचाराची प्रतिपूर्ती थांबवून कर्मचाऱ्यांची कोंडी करण्याचे काम प्रशासनाने केले व अस्तित्वातील अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून सदर व्यवस्था ‘मेडिक्लेम’ अंतर्गत खाजगी विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा घाट प्रशासनाने घालू नये असा सक्त ईशारा देखील काँग्रेस तर्फे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला. या योजने खाली खर्च मोठा होतो हा मनपा प्रशासनाचा दावा सारासार दीशाभूल करणारा असून, मनपा प्रशासनाच्या अयोग्य व अवाजवी निर्णय-व्यवस्थेचा फटका कामगारांना का(?) असा सवाल करून गोपाळदादा तिवारी यांनी प्रमूख वैद्यकीय खर्चाचे दरातील विसंगती स्पष्ट केली..
२००२ साल च्या ग्राह्य – दरांच्या सु दिडपट आज ही मनपा अदा करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे व मनपाच्या आर्थिक हिताचे नाह.. कारण त्यावेळचे सीटी स्कॅन, एमआरआय इ चे दर आज कितीतरी पटीने कमी आहेत.. तसेच ॲजीओप्लास्टी साठी राज्य सरकार याच योजनेखाली ₹६०,०००/- देते तर केंद्र सरकार ₹९०,०००/- देते तर मनपा मात्र २लाख (?) देत असल्याचे समजते तरी या विषयी राज्य सरकारने ऊच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील काँग्रेस पक्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ‘मनपा – स्थानिक प्रशासनातीलच आरोग्य अधिकारी’ यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील आपण मविआ सरकार कडे करणार असल्याचे सांगितले..
खाजगी मेडिक्लेम कंपन्याच्या दावणीला मनपा सेवकांना बांधणे अन्याय कारक असुन, पुणे मनपा प्रशासनाने कामगारांप्रती कर्तव्यपुर्तीच्या भावनेने ही योजना पुर्ववत (केंद्र व राज्य सराकारच्या धर्तीवर) सुरू ठेवावी अशी मागणी देखील गोपाळदादा तिवारी यांनी केली.. काँग्रेस पक्ष कामगार बंधू च्या पाठीशी सदैव राहील अ्से आश्वासन देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिले..
