सर्वजण प्रत्येक धर्माच्या मनावतेच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुयात- शरद पवार
पुणे : सर्वजण प्रत्येक धर्माच्या मनावतेच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुयात. -शरद पवार
आज जगामध्ये जे चित्र आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ द्यायची नसेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. या कार्यक्रमामध्ये आलेले सर्वजण सर्वाधर्मीय, सर्वपक्षीय आहेत. पुणे शहरातून शांततेचा आणि भाईचारेचा संदेश आपण देऊयात.सर्वजण प्रत्येक धर्माच्या मनावतेच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुयात. अशा शब्दांत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व धर्मीय सवभाव हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उपस्थित राहिले तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर नागरिकाशी ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
तसंच शरद पवारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबाबती वक्तव्य केलं. यावर बोलताना पवार म्हणाले, तंत्र्याच्या आंदोलनामध्य जसे नेहरू,बोस होते तसें मौलाना अब्दुल कलामही होते.त्यामुळे आपल्या एकोप्यामुळं इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. पल्यामध्ये कुणी द्वेष निर्माण करत असेल तर अशांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल.मूलनिवासी मंचच्या काही कार्यकर्त्यांनी कोविड काळात डेड बॉडी उचलण्याचं काम केलं. कोविड काळात या संघटनांनी सर्व जातीधर्माच्या लोकांचा अंत्यविधी स्वखर्चात केला.अशा लोकांची समाजाला गरज आहे.असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले ,रशिया-युक्रेन युद्धासह इतर आंतराष्ट्रीय घडामोडींचाही त्यांनी उल्लेख केला. रशियासारखा ताकदवर देश एका लहान देशावर (युक्रेन) हल्ला करतोय, त्या मोठ्या देशाला मनावतेच स्मरण नाहीये. श्रीलंका या देशात बुद्धाचं तत्वज्ञान आहे. त्या देशात नागरिक रस्त्यावर उतरालाय आणि राज्याकर्त्यांना अंडरग्राउंड व्हावं लागतंय.असंही पवार म्हणाले.
पाकिस्तानबाबत बोलताना पवार पुढे म्हणाले, पाकिस्तानमध्ये तुमचे माझे भाऊबंद सुद्धा राहतात. पाकिस्तानमध्ये प्रधानमंत्र्यांना पदावरून बाजूला केलं जातंय. त्या देशातील राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे हे पहायला मिळतंय. मी पाकिस्तानला अनेकवेळा गेलोय.
आपल्यामध्ये कुणी जातीय द्वेष निर्माण करत असेल.तर त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना केलं आहे.
