गर्दीच्या वेळी पुणे रेल्वे स्थानकावर आढळल्या जीलेटीनच्या कांड्या, सर्व गाड्या थांबवल्या

पुणे : ऐन गर्दीच्या वेळी पुणे रेल्वे स्थानकावर जीलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. यामुळे संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून  सर्व गाड्या रेल्वे स्थानकापासून लांब थांबवण्यात आल्या आहेत. आज दुपारी 12 च्या सुमारास हा प्रकार घडला असून यामुळे पुणे पोलिस हाय अलर्ट गेले आहेत. 

 नेमके काय घडले?

पुणे रेल्वे स्थानकावर दुपारी 12 च्या सुमारास एका कर्मचाऱ्याला पुणे रेल्वे स्थानकावर जीलेटीनच्या कांड्या ठेवल्याचे आढळले. त्यानंतर तातडीने रेल्वे पोलिस आणि पुणे पोलिसांना बोलवण्यात आले. दरम्यान, सादर पूर्ण परिसर रिकामा करून प्रवाशांना बाजूला घेण्यात आले. सर्व गाड्या रेल्वे स्थानकापासून लांब थांबवण्यात आल्या. बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कांड्या जवळच असलेल्या ससून रुग्णालयाच्या मैदानात नेण्यात आल्या आहेत. येथे या जीलेटीनच्या कांड्या निकामी करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात वाघोलीतून पुणे स्टेशनवर बॉंब ठेऊन उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज (१३ मे) पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारवर या जीलेटीनच्या कांड्या आढळून आल्याने गुप्तचर यंत्रणांना सतर्क झाल्या आहेत. 

कोणतेही धोक्याचे कारण नाही

“रेल्वे स्थानकावर आढळलेल्या जिलेटीन सदृश वस्तूची तपासणी करण्यात आली असून कोणतेही  धोक्याचे कारण नाही. कोणतेही  धोक्याचे कारण नाहीकोणतेही  धोक्याचे कारण नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटकं नाहीत. ते स्थानकावर कुणी ठेवले, याबाबत रेल्वे, पुणे पोलीस तपास करत आहेत.”

– अमिताभ गुप्ता (पुणे पोलीस आयुक्त)

 

Leave a Reply

%d bloggers like this: