एमआरए मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत पुण्याचा ऋग्वेद बारगुजे सर्वोत्तम रायडर

 

  •  एमआरएफ  मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत पेट्रोनस टीव्हीएस संघांचे वर्चस्व

पुणे : पुण्याचा माजी राष्ट्रीय विजेता ऋग्वेद बारगुजे याने ७००मीटर अंतराच्या आव्हानात्मक ट्रॅकवर वर्चस्व गाजवताना कॅटेगरी १ मधील दोन्ही शर्यती जिंकून सर्वोत्तम रायडर ‘किताब पटकावताना नुकत्याच पार पडलेल्या एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवला. पुण्यातील मुंढवा येथे पासपोर्टच्या समोरच्या मैदानावर हि स्पर्धा पार पडली.

ऋग्वेदच्या प्रभावी कामगिरीमुळे प्रेरणा मिळालेल्या पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग संघातील अन्य रायडर्सनी या स्पर्धेतील इतर कॅटेगरीमधील शर्यतींवर संपूर्ण वर्चस्व गाजवताना स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदासाठी आपल्या संघाचे स्थान भक्कम केले.

स्पर्धेच्या दिवशी अत्यंत उष्ण वातावरणात स्पर्धंपूर्वी संपूर्ण ट्रॅकला पाणी मारून चुरस आणखीनच वाढविण्यात आल्यानंतर ऋग्वेदने ट्रॅकचा अंदाज घेण्यासाठी एक चाचणी फेरी मारली व क्लास एक मधील हि शर्यत एकदा सुरु झाल्यावर लगेचच आघाडी मिळवताना त्याने आपला अनुभवी संघ सहकारी सीडी चिनन यालाहि दुसऱ्या क्रमांकावरच ठेवले. परिणामी तब्बल १० अवघड वळणे असलेल्या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीतहि याच दोघांनी पहिले क्रमांक राखून वर्चस्व गाजवले.

कोविड महामारीतील काळात एका अपघातामुळे झालेल्या दुखापतीमुळे दीर्घकाळानंतर ट्रॅकवर परतलेल्या बारगुजेने या शर्यतीतील कामगिरीच्या जोरावर ४०गुणांची कमाई करताना नाशिक येथील पहिल्या फेरीतील ३७ गुणांमध्ये बहुमोल भर घातली व शर्यतीचा हा मौसम संपत आला असताना सर्वसाधारण विजेतेपदासाठी आपले आव्हान दिले.

क्लास 1 एसएक्स 1:

  1. ऋग्वेद बारगुजे(टीव्हीएस-आरटीआर 300, पेट्रोनस टीव्हीएस संघ), 2. ईक्षण शानबाग(टीव्हीएस-आरटीआर300पेट्रोनस टीव्हीएस संघ), 3. सीडी जिनन(टीव्हीएस-आरटीआर300पेट्रोनस टीव्हीएस संघ),4. व्ही प्रज्वल((टीव्हीएस-आरटीआर 300पेट्रोनस टीव्हीएस संघ),5. श्लोक घोरपडे(केटीएम 150–सातारा).

क्लास 2 एसएक्स2:

  1. के मनीकरण(कावासाकी केएक्स250—कोईम्बतूर,2.भूमिक लालवानी(कावासाकी केएक्स250—माउंट अबू, 3.अजय श्रीनिवास(कावासाकी केएक्स250—बँगलोर), 4.श्लोक घोरपडे(केटीएम150–सातारा), 5.द्वेन जोहानस(सीआर 250—मुंबई)

क्लास 3 नोव्हिस:

1.जेरवा बुंटेलग(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),2. सचिन डी.(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),3.अरुण टी(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),4.जिनेंद्र सांगवे(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),5. राजेश स्वामी(हिरो इम्पल्स-पेन)

क्लास 4 स्थानिक:

1.जिनेंद्र सांगवे(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ), 2.राजेश स्वामी(हिरो इम्पल्स-पेन),3.रसेल जोस्सी(हिरो इम्पल्स),4.पिंकेश ठक्कर(हिरो इम्पल्स), 5.राकेश भोसले(हिरो इम्पल्स).

क्लास 5 इंडियन एक्स्पर्टस:

1.अरुण टी.(हिरो इम्पल्स),2.आर नटराज(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),3. डी.सचिन जंग(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),4. आर. सबरीश(हिरो इम्पल्स)—कोईम्बतूर, 5. कालिमोहन(टीव्हीएस आरटीआर 200–पेट्रोनस टीव्हीएस संघ),आर.सबरीश(हिरो इम्पल्स-कोईम्बतूर)

 

क्लास 6 प्रायव्हेट एक्स्पर्टस:

1.अरुण टी(हिरो इम्पल्स-हस्सन),2.शैलेश कुमार(हिरो इम्पल्स-कोईम्बतूर),3.योगेश पी.(हिरो इम्पल्स-बँगलोर),4.आर सबरीश(हिरो इम्पल्स-कोईम्बतूर), 5.पिंकेश ठक्कर(हिरो इम्पल्स-पुणे)

क्लास 7 ज्युनियर एसएक्स1:

1.श्लोक घोरपडे(केटीएम 150 –सातारा), 2. जिनेंद्र सांगवे(कावासाकी केएक्स250–इचलकरंजी, 3.सुजन जे(कावासाकी केएक्स250–कोईम्बतूर),4.अनास्त्या पॉल(कावासाकी केएक्स100–बँगलोर), 5.फैज सय्यद(केटीएम एसएक्स85–पुणे).

क्लास 8 ज्युनियर एसएक्स2:

1.अक्षत हूपले(केटीएम एसएक्स85–पुणे), 2.भैरव सी(हस्क्वारना—बँगलोर),3.सुजन जे(केटीएम एसएक्स65–कोईम्बतूर),4. यश शिंदे(केटीएम एसएक्स65–पुणे), 5.चैतन्य जोशी(केटीएम एसएक्स65-पुणे),.

Leave a Reply

%d bloggers like this: