Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांमध्ये 27 टक्के तिकिटं ओबीसी उमेदवारांना

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगाला निवडणुकांसंदर्भात येत्या 15 दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणा शिवाय होणार असल्याचे उघड आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांमध्ये 27 टक्के तिकिटं ओबीसी उमेदवारांनाच दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी भाजपने अनेक आंदोलने केली. या आरक्षणासाठी भाजप भविष्यातही लढतच राहिल. दरम्यान, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होणार नाही तोवर भाजपच्या वतीने येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व निवडणुकीत 27 टक्के तिकिटं ही ओबीसी उमेदवारांनाच दिली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading