महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली – देवेंद्र फडणवीस
मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणावरून आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी ओबीसी हितासाठी मजबूर केलं आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होत आहेत. हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली आहे. यात मोठे षड्यंत्र आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणीमध्ये ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, सरकारला कोर्टाने सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही पूर्ण केली नाही. कोर्टाने ट्रिपल टेस्ट करा असे कोर्टाने 2019 साली सांगितलं. त्यावेळी ठाकरे सरकार होतं पण सरकारने फार काही केलं नाही. सहा वेळा वेळ मागितली, कार्यवाही पूर्ण केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. सातत्यानं महाविकास आघाडीकडून विश्वासघाताचं राजकारण केलं जात आहे. योग्य काळजी न घेताच आकडेवारी सरकारनं सादर केली, असंही ते म्हणाले.
