fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

साधना कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

पुणे  : रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयात इयत्ता पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी,आजीव सेवक प्राचार्य विजय शितोळे,विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर,पर्यवेक्षक छाया पवार, योजना निकम, प्रतिभा कुंभार, शुभांगी नवगण, किर्ती लंभाते तसेच पालक,विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी किसनराव रत्नपारखी यांनी विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 51 विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने सर्व विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सुजाता कालेकर यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थिनींची सर्वांगीण गुणवत्ता जोपासत असल्याचे सांगितले. पूनम पवार, स्वरदा फडके, संस्कृती फुंदे यांनी विद्यार्थिनींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

सभाग्रहात विद्यार्थिनी व पालकांची गर्दी, कौतुकात न्हाऊन निघालेल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील हास्य, उज्वल भविष्यासाठी दिलेल्या शुभेच्छा हा कौतुक सोहळा पाहताना पालकांच्या डोळ्यात तळलेले आनंदाश्रू अशा उत्साहपूर्ण वातावरणात गौरव सोहळा संपन्न झाला. पर्यवेक्षिका छाया पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे निवेदन उपशिक्षक शिवाजी मोरमारे व कविता टिळेकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading