राज ठाकरेना अटक झाली तर राज्य सरकार जबाबदार – साईनाथ बाबर
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती.या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबाद पोलीस राज ठाकरे यांना अटक करण्याची शक्यता आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांना जर अटक झाली तर जो पुण्यात तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिला आहे.