अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या हातावर सजली विराजसच्या नावाची मेहंदी; पहा फोटो आणि व्हिडिओ

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता, लेखक, दिग्दर्शक विराजस कुलकर्णी हे सेलिब्रिटी कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आज शिवानीच्या हातावर मेहंदी काढण्यात आली आहे. सोशल मिडियावर या दोघांच्या मेहंदीचे फोटो व्हारल झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे शिवानी ज्या नावाने विराजसला हाक मारते तेच नाव तिने आपल्या हातावर लिहिले आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळे हीने ‘बन मस्का’ या मालिकेतून अभिनयाला सुरूवात केली. तर स्टार प्रवाह या वाहीनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतील रमाबाई आंबेडकर या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली.

तर अभिनेता विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा असून त्याने झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच लेखक, दिग्दर्शक म्हणूनही त्याची ओळख आहे.

हे दोघेही येत्या 7 मे 2022 रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: