Saturday, July 25, 2026
Latest NewsMAHARASHTRA

नवतंत्रज्ञानाच्या मदतीने द्विशिक्षकी शाळा परिपूर्ण शिक्षण देऊ शकतात

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय परिषदेतील मत

मुंबई : नवतंत्रज्ञानाच्या मदतीने द्विशिक्षकी शाळा परिपूर्ण शिक्षण देऊ शकतात. त्यामुळे या शाळांच्या बाबतीत शासनाने देखील आपली भूमिका बदलावी आणि त्या शाळांना चालना द्यावी, असे मत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत व्यक्त करण्यात आले. या परिषदेतच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ च्या फेलोंची नावे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत खासदार सुळे यांनी घोषित केली.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शाळांची ओळख शिक्षकांनी राबवलेल्या धोरणावर ठरत असते. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी आज आणि उद्याही शिक्षकाला पर्याय नाही त्यामुळे नव्या साधनांचा वापर करताना शिक्षक हाच केंद्रबिंदू ठेऊन काम करायला हवे. त्याचबरोबर शाळांसाठी क्लस्टर संकल्पनेचा वापर करायलाय हवा.”

जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणाले, “आजवर शिक्षण क्षेत्रासाठी लोकसहभाग ही संकल्पना वापरण्यात आली, पण आता ‘लोकांचा पुढाकार’ ही संकल्पना शाळेच्या सशक्तीकरणासाठी महत्वाची आहे. शिक्षकांना स्वायत्तता दिली, तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करु शकतात. द्विशिक्षकी शाळांमध्ये तर कामासाठी त्यांना खूप मोठा वाव मिळू शकतो. शासनानेही या शाळांच्या बाबतीत आपली भूमिका बदलावी आणि त्या शाळांना चालना द्यावी.”

निवड झालेल्या फेलोंची पुढील प्रमाणे :
प्राथमिक विभाग शिक्षक :
सोमनाथ वामन वाळके, प्रवीण दत्तात्रय शिंदे, वर्षा विशाल गायकवाड, जगदीश श्रीकृष्ण कुडे, गजानन निवळे, रामकृष्ण वाटेकर, राजकिरण आत्माराम चव्हाण, किशोर मोतिराम भागवत, कृष्णा खंडू कुदळे, उमेश रघुनाथ खोसे

माध्यमिक विभाग शिक्षक :
नंदकिशोर तुकाराम बोकडे, कृष्णात दामोदर जाधव, अतुल बाळकृष्ण सवाखंडे, पूनम लक्ष्मण पाटील, रामू सिताराम जाधव, विवेक गुणवंतराव चव्हाण, डॉ. सोमनाथ श्रीरंग राऊत, शिवानी सचिन लिमये, मंगेश कडलग, शिल्पा किशोर पाटील – भोंडे

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading