मुख्यमंत्र्यांनी रघुनाथ कुचिकचा राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा – चित्रा वाघ
पुणे:कुचिक प्रकरणात आज चित्रा वाघ यांचा जबाब नोंदवला दरम्यान, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. कुचिक प्रकरणात त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. कुचिक यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिकर यांच्या जामीन अर्जावर हरकत घेत 15 एप्रिलला पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या संदर्भात त्यांना आज चौकशीसाठी पुणे पोलिांकडून बोलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या, पीडित तरुणी बलात्कारी प्रकरणातील आरोपी रघुनाथ कुचिकचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा. अशी मागणी भाजपच्या नेत्या व प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना केली.
चित्रा वाघ म्हणाल्या,पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते.मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
पीडित तरुणी मुलीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या ,पीडित तरुणीच्या पाठीशी मी कायम उभी राहणार,तिला जी मदत लागणार ती करणार. असे चित्रा वाघ म्हणाल्या.
पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते,मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का ?
बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांचा जामीन अर्ज रद्द व्हावा म्हणून मी आज माझा जबाब दिलाय, माझी कधी गरज लागली तर यायला तयार आहे. असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
भाजपचे नेते गणेश नाईक यांनी एका मुलीवर बलात्कार केला आहे . त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, गणेश नाईक प्रकरणातील पीडित महिलेच्या पाठीशी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आहे.
मात्र नाईक दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा . अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
अहंकारातून कोण कुणाला रावण म्हणतो हे पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्यांनी त्याचा अंत करावा आणि मग महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं”, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, विरोधकांच्या अंगात रावण संचारलाय त्यांनी त्याचा अंत करावा इति सर्वज्ञानी संजय राऊत. आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगात शकुनी मामा संचारलाय. त्याचा अंत महाराष्ट्राची जनताच करेल.अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
