पवारांना ‘हिंदू’ शब्दाची अॅलर्जी – राज ठाकरे 

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद सुरू झाला, या त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहत राज ठाकरे म्हणाले, “मी पवार साहेबांना नास्तिक म्हणालो तर त्यांना झोंबल; पण सुप्रिया सुळेंनी हे लोकसभेत सांगितलय. मी टीका केल्या पासून त्यांनी शिवाजी महारांच नाव घ्यायला आणि त्यांच्या सोबत फोटो काढायला सुरूवात केली आहे. पण खर तर पवारांना ‘हिंदू’ शब्दांची अॅलर्जी आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर औरंगाबाद येथील सभेत टीका केली.

राज ठाकरे म्हणाले की, माझी सभा झाल्यावर सगळे फडफडायला लागले. शरद पवार साहेब  म्हणाले, मी जाती जातीत तेढ निर्माण करतोय. पण मी सामाजिक प्रश्नावर भाष्य करत आहे. मला दंगल घडवायची नाही. मी प्रबोधनकारांची सगळी पुस्तकं वाचली आहेत. पण पवार साहेबांनी फक्त त्यांना जे पाहीजे तेव्हडेच वाचले. पण खर तर पवारांना ‘हिंदू’ शब्दांची अॅलर्जी आहे. पवार कोणत्याही सभेत शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. याउलट पवारांनी जेम्स लेन वरून पुरंदरेंना ब्राम्हण आहे म्हणून त्रास द्यालया सुरूवात केली. राजकीय फायद्यासाठी पवारांनी अनेक वाद उकरून काढले. रामदास स्वामी यांच्या बद्दलही असेच वाद निर्माण केला

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार भटभिक्षुकीच्या विरोधात होते. पण ते हिंदू धर्म मानणारे आणि पूजा करणारे होते. नवरात्र उत्सव माझ्या आजोबांनी सुरू केला. आम्हाला घरात कधीही जात शिकवली गेली नाही. मी जात पात मानत नाही. मी ब्राम्हणांच प्रतिनिधीत्व करायला इथे उभा नाही.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: