.. तर मशिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा – राज ठाकरे
औरंगाबाद : मला दंगल घडवायची नाही. रमजानच्या सणात मला वीष कालावायचे नाही. पण विनंती करूनही समजणार नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवलच पाहिजे. भोंगे उतरले नाही तर 4 तारखे नंतर मशिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणारच. एकदाच हा विषय संपवला पाहिजे. अभी नही तो कभी नही.. अशी परिस्थिती आहे, आपण शांत बसता कामा नये, अशा शब्दांत आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समस्त देशातील हिंदूंना आवाहन केले.
आज महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडली आहे. यावेळी त्यांनी माशीदीवरील भोंग्यांवर भाष्य केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, मी फक्त भोंग्यांना पर्याय दिलाय. हा धार्मिक विषय नाही हा सामाजिक विषय आहे. पण तुम्ही हा धार्मिक विषय बनवणार असताल तर आम्ही यांचे उत्तर धार्मिक पद्धतीनेच देऊ. हा सामाजिक विषय आहे. लोक म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली. मग आज पर्यंत भोंगे का काढले नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज ठाकरे म्हणाले –
- औरंगजेबाला काळालं होत छत्रपती हा व्यक्ती नाही एक विचार आहे
- डॉ. बाबासाहेब म्हणाले होते लोकांच्या अंगात देवी येते पण कधी शिवाजी का येत नाही?
- आपण महापुरूषांच्या फक्त जयंत्या साजऱ्या करतोय त्यांचा विचार कुठे आहेत ?
- महाराष्ट्राने देशाला भरभरून दियलं
- माझी सभा झाल्यावर सगळे फडफडायला लागले. शरद पवार साहेब म्हणाले, मी जाती जातीत तेढ निर्माण करतोय.
- मी पवार साहेबांना नास्तिक म्हणालो तर त्यांना झोंबल; पण सुप्रिया सुळेंनी हे लोकसभेत सांगितलय
- प्रबोधनकार भटभिक्षुकीच्या विरोधात होते. पण ते हिंदू धर्म मानणारे आणि पूजा करणारे होते. मी त्यांची सगळी पुस्तक वाचली आहेत. पण पवार साहेबांनी फक्त पाहीजे तेव्हडेच वाचले.
- नवरात्र उत्सव माझ्या आजोबांनी सुरू केला.
- राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद सुरू झाला.
- पवारांनी जेम्स लेन वरून पुरंदरेंना त्रास द्यालया सुरूवात केली.
- मी जात पात मानत नाही. आम्हाला घरात कधीही जात शिकवली गेली नाही.
- मी ब्राम्हणांच प्रतिनिधीत्व करायला इथे उभा नाही.
- ज्या महाराष्ट्राने उदात्त विचार दिले तो जातीत सडतोय
- आम्ही जातीतून बाहेर आलो नाही तर आम्ही हिंदू कधी होणार, मराठी कधी होणार?
- राजकीय फायद्यासाठी अनेक पवारांनी अनेक वाद उकरून काढले.
- रामदास स्वामी यांच्य द्दलही असेच वाद निर्माण केला
- सभेच्या वेळी बांग लावणार असेल तर औरंगाबाद पोलिसांना आधीच सांगतो आवाज बंद करा
