Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

CYDA संस्था आणि Coforge ह्या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करोनाग्रस्त कुटुंबातील महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

पुणे : मागील दोन वर्षांपासून कोविड 19 ह्या आजाराचे संकट हे जगभर सगळीकडे असल्याचे आपल्याला दिसून आले ह्या आजाराचा फटका अनेक कुटुंबियांना बसला. त्यांची आर्थिक घडी मोडलीच पण आपल्या निकट वर्तीयांना गमावल्यामुळे मोठ्या मानसिक आघातातून जावे लागले. ह्या परिस्थिती चा आढावा घेत CYDA संस्था आणि Coforge ह्या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करोनाग्रस्त कुटुंबातील महिलांचे मनोबल व आर्थिक पाठबळ वाढावे म्हणून
व्यवसाय प्रशिक्षण दि. २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ या दरम्यान भारत नगर,येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आले. ह्या 4 दिवसाच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात 19 महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व कौशल्य मिळविले. ह्याच प्रशिक्षण च्या प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्ताञय भापकर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आणि श्री.निखिल गायकवाड पत्रकार व निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष यांची उपस्थिती लाभली. सोबत CYDA संस्थे चे प्रोग्राम मॅनेजर प्रमोदींनी नाईक, प्रोग्राम कॉर्डिनेटर प्रितेश कांबळे, प्रशिक्षक शिल्पा बहाडे आणि स्मिता सोंडे ह्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढविले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading