Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता – देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर भाजपची बुस्टर डोस सभा झाली. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाबरी मशिदीवरून शिवसेनेला लक्ष्य केले. बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होते, असे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, ते (उद्धव ठाकरे) काय म्हणाले परवा, म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. कोणीतरी प्रश्न केला, मशिदींवरील भोंगे काढायला यांना जमलं नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली. तो बाबरी ढाचा.. मी त्याला मशीद मानत नाही. कोणी हिंदू मशीद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला. माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर, त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिराकरिता बदायूच्या तुरुंगात मी 18 दिवस घालवले.”

दरम्यान यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र दिन फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा आज दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत म्हणाले आहेत की, ”काही लोकांचा गैरसमज आहे की, ते म्हणजेच महाराष्ट्र आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या 12 कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे. तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे, हिंदू नाही..पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading