महाराष्ट्र जाती – जातीत सडतोय – राज ठाकरे

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद सुरू झाला. राजकीय फायद्यासाठी अनेक पवारांनी अनेक वाद उकरून काढले. ज्या महाराष्ट्राने उदात्त विचार दिले तो आज जातीत सडतोय. आम्ही जातीतून बाहेर आलो नाही तर आम्ही हिंदू कधी होणार, मराठी कधी होणार?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत उपस्थित केला.

राज ठाकरे म्हणाले, मी जात पात मानत नाही. आम्हाला घरात कधीही जात शिकवली गेली नाही. मी इथे ब्राम्हणांच प्रतिनिधीत्व करायला उभा नाही. पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद सुरू झाला. राजकीय फायद्यासाठी अनेक पवारांनी अनेक वाद उकरून काढले. ज्या महाराष्ट्राने उदात्त विचार दिले तो आज जातीत सडतोय. आम्ही जातीतून बाहेर आलो नाही तर आम्ही हिंदू कधी होणार, मराठी कधी होणार?

पुढे बोलताना ते म्हणाले, मी प्रबोधनकारांची सगळी पुस्तक वाचली आहेत. पण पवार साहेबांनी फक्त पाहीजे तेव्हडेच वाचले. प्रबोधनकार भटभिक्षुकीच्या विरोधात होते. पण ते हिंदू धर्म मानणारे आणि पूजा करणारे होते. नवरात्र उत्सव माझ्या आजोबांनी सुरू केला. मला दंगल घडवायची नाही. पण भोंग्यांचा प्रश्न हा सामाजिक आहे. पण विनंती करूनही समजणार नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवलच पाहिजे.

…आधीच सांगतो आवाज बंद करा

राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी कोठून तरी बांगचा आवाज येत होता. तेव्हा राज ठाकरे यांनी औरंगाबाद पोलिसांना सांगितले की, “माझ्या सभे दरम्यान अजान किंवा बांग लावणार असेल तर आधीच सांगतो आवाज बंद करा त्यांच्या तोंडात बोळा कोंबा.”

Leave a Reply

%d bloggers like this: