MPSC EXAM RESULT : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चा निकाल जाहीर 

इतिहासात प्रथमच मुलाखती नंतर तासाभरात निकाल जाहीर 

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल चार वेळा पुढे ढकलल्या गेलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०चा अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर २०१९ मध्ये १५ संवर्गातील २०० पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल २०२०मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली. अखेर मार्च २०२१मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी २ लाख ६२ हजार ८९१ उमेदवारांनी नोंदणी केली, तर १ लाख ७१ हजार ११६ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर करण्यात आला. ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८६३ उमेदवारांनी डिसेंबर २०२१मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ६१५ उमेदवारांपैकी ५९७ उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर १८ ते २९ एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. 

Leave a Reply

%d bloggers like this: