Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर पण वसंत मोरे अनुपस्थित? चर्चेला उधाण

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी आज ते त्यांच्या पुण्यातील राहत्या घरून औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसेचे पुणे आणि मुंबईतील हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आहे. वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसे सोडली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे यासंदर्भात जी भूमिका घेतली होती त्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना माझ्या प्रभागात मशिदीसमोर भोंगे लावणार नाही असं देखील जाहीर केलं होतं. तेव्हा वसंत मोरेंच्या या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर काही मनसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.

त्यानंतर अचानक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. तर त्यांचीच सहकारी असलेले साईनाथ बाबर यांच्यावर पुणे शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक हाकालपट्टी झाल्याने वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. दरम्यान याच कालावधीत इतर काही राजकीय पक्षाकडून वसंत मोरे यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या. परंतु वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात वसंत मोरे यांची हजेरी कमी झाली. आज राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने अवघ्या काही वेळात रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत जाण्यासाठी अनेक माणसांनी आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. मात्र या ठिकाणी वसंत मोरे यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवते. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम तर केला नाही ? ना असा प्रश्न सर्वांना पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading