वन मोटो इंडियाची रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्ससह भागीदारी

मुंबई : भारतातील एलिगंट आणि प्रीमियम ईव्हीचा पहिला ब्रिटीश ब्रँड वन-मोटो इंडियाने ग्राहकांना डीलरशिपच्या ठिकाणी ईव्ही विमा पॉलिसी जारी करण्यासाठी रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (रॉयल सुंदरम) सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीद्वारे वन मोटो इंडियाचे ग्राहक ब्रँडद्वारे जारी केलेल्या त्यांच्या मोटर पॉलिसींमध्ये कव्हर- डेप्रिसिएशन वेवर (विमा घसारा माफीचा) लाभ घेऊ शकतील.याशिवाय, ग्राहकांना वन मोटो केंद्रांवर दाव्यांसाठी स्पर्धात्मक किंमत आणि कॅशलेस सुविधा देखील दिली जाईल. या ईव्ही स्टार्टअपने अलीकडेच भारतभर सुलभ रोडसाइड असिस्टन्स सेवा प्रदान करण्यासाठी ग्लोबल अॅश्युरसोबत आपली भागीदारी जाहीर केली आहे.

रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्ससोबतची भागीदारी वापरकर्त्यांना अधिक सुविधा देण्याच्या दिशेने आणि विक्रीच्या ठिकाणी विम्यासह ग्राहकांच्या सर्व गरजांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ म्हणून उचललेले आणखी एक पाऊल आहे.

वन मोटो इंडियाचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष आदित्य रेड्डी यांनी सांगितले की, “ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. बहुसंख्य ग्राहक प्रथमच ईव्हीचा अनुभव घेत आहेत हे लक्षात घेता, ते आयसीइ ते ईव्हीमध्ये संक्रमण सक्षम करण्यासाठी अधिक समर्थन शोधत आहेत. आम्ही ही गरज ओळखली आहे आणि नामांकित संस्थांच्या सहकार्याने ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आमच्या विवेकी ग्राहकांना एकाच छताखाली सर्वकाही देऊ करता येईल.”

सध्या बाजारात या ब्रँडच्या बायका, इलेक्टा आणि कम्युटा या तीन वेगवेगळ्या ईव्ही दुचाकी उपलब्ध आहेत. ३ महिन्यांच्या अल्प कालावधीत तीन उत्पादने लाँच केल्यानंतर ब्रँडने त्याच्या सेवांचा विस्तारही चालू केला आहे. वन मोटो इंडिया ही भारत सरकारने ई-एएमआरआयटी (भारताच्या वाहतुकीसाठी प्रवेगक ई-मोबिलिटी क्रांती) साठी मंजूर केलेल्या तीन कंपन्यांपैकी एक आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: