Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

भीमा कोरेगाव आयोगाचे शरद पवारांना समन्स

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर हजर राहण्यासाठी नव्याने समन्स बजावले आहे. येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईतील सुनावणीत हजर राहण्यासाठी पवारांना बजावलेले हे तिसरं समन्स आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी वातावरण बिघडवले होते. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असे विधान पवारांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.

पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले होते. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवार यांना २३ आणि २४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. त्यापूर्वी ४ एप्रिल २०२१ ला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading