संभाजी भिडे सायकलवरून पडले ! अतिदक्षता विभागात दाखल

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याचे वृत्त आहे. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्या खुब्याला मार लागला आहे. भिडे यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

अपघाताची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे गुरुजी हे सायकलवरून प्रवास करतात. नेहमी प्रमाणे ते सायंकाळच्या सुमारास शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले होते.

दरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपण चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. ही घटना आसपासच्या लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ धाव घेत संभाजी भिडे गुरुजी यांना सावरले. मात्र, या अपघातामध्ये त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अनेक धारकऱ्यांना गणपती मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी केली होती. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: