Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कोंढवा येथील फर्निचर गोडाऊनला भीषण आग

पुणे : येथील कोंढवा भागातील फर्निचर गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली. फर्निचरचे गोडाऊन असल्याने आग वेगाने पसरली. तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या प्रारथमिक माहितीनुसार, कोंढवा भागातील पारगे नगर येथे असलेल्या 5 ते 6 फर्निचरच्या गोदामाला दुपारच्या सुमारास भीषण अचानक आग लागली. आगीचे लोट आणि धूर खूप वर पर्यंत आकाशात दिसत होते. या आगीत संपूर्ण फर्निचरचं गोदाम जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading