सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सांगीतिक वाटचाल अधिक समृद्ध होणार

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळासोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार

पुणे: ललित कला केंद्र या गुरुकुलापासून सुरू असलेली कलेची वाटचाल आता अधिक समृद्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच शंभर वर्षे जुन्या अशा संगितातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाशी सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारावर सोमवार दिनांक २५ एप्रिल रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, इनोव्हेशन सेलच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, अभिनेते राहुल सोलापूरकर, गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर, उपाध्यक्ष पांडुरंग मुखडे आणि सचिव बाळासाहेब सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून या दोन्ही नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थी, साहित्य, प्राध्यापक यांची देवाणघेवाण होणार आहे तसेच काही एकत्रित उपक्रमही राबविता येणार आहे. यानिमित्ताने शंभर वर्षे जुन्या गांधर्व महाविद्यालय मंडळाशी विद्यापीठ जोडले गेले आहे. गांधर्व महाविद्यालय मंडळ हे मोठ्या शहरापासून खेडोपाड्यापर्यंत पोहोचले आहे. शास्त्रीय गायनाची जाणीव निर्माण करणारे हे विद्यालय असून या करारामुळे विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: