Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता 

पुणे : राज्यात पावसासाठी हवामान पोषक असले तरी काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. परिणामी कमाल तापमानातील चढ-उतार सुरू आहे. राज्यात उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा ही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

सोमवारी राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली होती. मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट पाहायला मिळाली. दरम्यान पुढील तीन दिवस राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान हे २ ते ४ अंशांनी वाढू शकेल. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार येत्या गुरुवारपर्यंत (ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रात २६ ते २९ एप्रिल या कालावधित उष्णतेची लाट येऊ शकते. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading