गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी सुटका तुरुंगाबाहेर येताच म्हणाले ‘हम हिंदुस्तानी’

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. सन २०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. काही वेळापूर्वीच सदावर्ते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर वाट पाहत होते. बाहेर येताच त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत ‘हम है हिंदुस्थानी’ म्हणत एसटी कामगारांचा विजय असो म्हणाले.

भारताच्या संविधानापेक्षा मोठा कोणी नाही. यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू. जय श्री राम, जय भीम आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे देश जिंकत असतात, आतापुरते एवढेच असे म्हणत पुढे बोलू, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.

सन २०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला होता. परंतू या आदेशामुळे त्यांना अटक करता आलेली नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: