पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयटीएल चे एमडी डॉ. दीपक मित्तल यांना लिक्टनस्टाइनच्या क्राउन प्रिन्स यांच्या सन्मानार्थ आयोजित विशेष स्नेहभोजनाचे निमंत्रण
नवी दिल्ली : जगातील सर्वात बलाढ्य उद्योग दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींनी उभे केले आहेत, ज्यांच्याकडे आपल्या महत्त्वाकांक्षांचे आंतरराष्ट्रीय यशोगाथेत रूपांतर करण्याचे धाडस होते. इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड (आयटीएल) आज भारतातील अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे जागतिक स्तरावर सन्मानित शक्तीत रूपांतर झाल्याचे प्रभावी उदाहरण म्हणून ठामपणे उभी आहे.
२०२६ मध्ये कंपनी आपल्या तीन दशकांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करत असताना आयटीएलच्या शिरपेचात राष्ट्रीय प्रतिष्ठेचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. आयटीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. दीपक मित्तल यांना माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्याकडून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे, लिक्टनस्टाइनचे क्राउन प्रिन्स महामहीम प्रिन्स अलोईस यांच्या सन्मानार्थ आयोजित विशेष स्नेहभोजनासाठी प्रतिष्ठित निमंत्रण मिळाले. ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) अंतर्गत द्विपक्षीय आणि आर्थिक सहयोग अधिक दृढ करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
युरोपातील आघाडीच्या उद्योगपतींच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह महामहीम क्राउन प्रिन्स अलोईस यांचा हा भारत दौरा भारत आणि लिक्टनस्टाइनमधील वेगाने दृढ होत चाललेल्या आर्थिक व धोरणात्मक संबंधांवर प्रकाश टाकतो. ऐतिहासिक भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या अंमलबजावणीनंतर उच्चस्तरीय चर्चा प्रामुख्याने प्रगत उत्पादन, औद्योगिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि सीमापार उद्योग गुंतवणूक यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील सहयोग वाढवण्यावर केंद्रित होत्या.
डॉ. दीपक मित्तल यांच्यासारख्या दूरदर्शी भारतीय व्यावसायिक प्रमुखाची उपस्थिती द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी, तंत्रज्ञान सहयोग अधिक दृढ करण्यासाठी आणि भारत व मध्य युरोपीय अर्थव्यवस्थांमध्ये प्रबळ व्यापारी सेतू उभारण्यासाठी खाजगी क्षेत्रातील नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका लक्षणीय ठरली.
आयटीएलच्या जागतिक यशाची ही ऐतिहासिक गाथा तीन दशकांपूर्वी १९९६ मध्ये सुरू झाली, जिथे कंपनीने होशियारपूर येथून आपला पहिला ट्रॅक्टर डिझाइन केला आणि त्यावर ठळकपणे ‘INTERNATIONAL’ शब्द कोरला. छोट्या बिगर-औद्योगिक शहरातून काम करणाऱ्या एका तरुण भारतीय उत्पादकासाठी जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये जागतिक दर्जाची गुणवत्ता देण्याचा हा धाडसी निश्चय होता.
गेल्या काही वर्षांत कंपनीने जागतिक मंचावर भारतीय अभियांत्रिकीचे निकष सातत्याने दृढ केले आणि एका महत्त्वाकांक्षी स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय उद्योगात रूपांतरित झाला आहे. गेल्या सलग ८ वर्षांपासून कंपनीने भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. १५० हून अधिक देशांमध्ये आपली उपस्थिती प्रस्थापित करत, कंपनीने १५ देशांमध्ये आघाडीच्या स्थानासह जगातील पाच सर्वात मोठ्या ट्रॅक्टर ब्रँड्समध्ये स्थान मिळवले आहे.
याप्रसंगी मत व्यक्त करत इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. दीपक मित्तल म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता प्रभाव आणि प्रतिष्ठा दर्शवणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रसंगाचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. लिक्टनस्टाइनचे क्राउन प्रिन्स महामहीम प्रिन्स अलोईस यांच्या सन्मानार्थ आयोजित स्नेहभोजनाच्या या निमंत्रणाबद्दल मी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा मनापासून आभारी आहे. ऐतिहासिक भारत-ईएफटीए कराराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उच्चस्तरीय चर्चेत प्रगत उत्पादन, औद्योगिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि सीमापार गुंतवणूक यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या ट्रॅक्टर उद्योग विकासाचे नेतृत्व करणाऱ्या आयटीएलसारख्या खाजगी भारतीय कंपन्यांची जागतिक प्रतिष्ठा दिसून आली आहे, जिथे आपल्या देशातून निर्यात होणारा प्रत्येक ३ रा ट्रॅक्टर सोनालिका/सोलिस ब्रँडचा असतो.
तीन दशकांपूर्वी आम्ही आमच्या पहिल्या ट्रॅक्टरवर ‘INTERNATIONAL’ हे नाव कोरले होते, तेव्हा भारतीय अभियांत्रिकीला जगभरात नेण्याची आमची धाडसी महत्त्वाकांक्षा होती आणि आज त्याच महत्त्वाकांक्षेने आम्हाला जगातील पहिल्या ५ मोठ्या ट्रॅक्टर कंपन्यांच्या यादीत घेऊन आले आहे हे पाहणे अत्यंत समाधानकारक आहे. भारताला जागतिक स्तरावर आदरणीय मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस बनवण्याच्या प्रवासात योगदान देण्याची संधी मिळणे ही बाब या प्रवासाला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवते. एखाद्या भारतीय उद्योगाची खरी ताकद केवळ त्याने किती प्रगती केली यात नसून जागतिक मापदंडांना किती धाडसाने सातत्याने आव्हान देतो यात आहे. मला विश्वास आहे की, आमची सर्वात मोठी उपलब्धी अजून पुढेच आहे आणि आमचा भारताच्या उत्पादन उत्कृष्टतेला आणखी मोठ्या उंचीवर नेण्याचा निर्धार आहे.”
