राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पुणे दौऱ्यावर

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या २२ एप्रिल पासून पुणे दौऱ्यावर आहेत. यामध्ये दि. २३ अणि २४ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघटनात्मक कामाच्या विविध बैठकांमध्ये त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव यांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी बैठक २३ आणि २४ एप्रिलला पुण्यात फुलगाव येथे होणार आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास नियमित संघटनात्मक कार्यासाठी आहे.

तसेच हडपसर येथील डॉ. दादा गुजर माता-बाल रुग्णालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सानेगुरुजी प्राथमिक विद्या मंदिरासमोर माळवाडी, हडपसर,पुणे येथे होणार आहे, अशी माहिती डॉ प्रवीण दबडघाव यांनी दिली.

 

Leave a Reply

%d bloggers like this: