मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रवादीची तक्रार दाखल 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आणखी एक तक्रार शिवाजनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अॅ ड. सदावर्ते एका व्हिडीओमध्ये मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

एसटी आंदोलनकर्त्यांची न्यायालयात बाजु मांडण्याचे काम अॅ ड. सदावर्ते यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेनंतर अॅ ड. सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. या पार्श्‍वभुमीवर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने पुजा झोळे यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अॅ ड. सदावर्ते यांचा एक व्हिडीओ जयश्री पाटील यांनी प्रसारीत केला आहे. या व्हिडीओमध्ये अॅ ड. सदावर्ते हे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या वक्तव्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्याकडून जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रार देताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सरचिटणीस शिल्पा भोसले, पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, अॅ ड. सदावर्ते यांनी मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली ते कुठून आले यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आहे. त्यांच्या या भाषेने महाराष्टातील तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामध्ये जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न दोघांनी केला आहे. भारतीय संविधानाने जरी बोलण्याचे अधिकार दिलेले असले तरी त्यांला मर्यादा दिलेली आहे. ती गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी ओलांडली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि जाती जातीमध्ये वाद लावून समाजात अराजकता माजेल या प्रकारचे कृत्य हे दोघे करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे कामी गुन्हा दाखल करावा. हि विनंती करणारा अर्ज पोलिसांना देण्यात आला आहे, असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: