कात्रज आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात पाणी प्रश्नावरून आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनाला हिंसकवळन लागले आहे. आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. कात्रज परिसराचा पुणे महापालिकेत समावेश होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरी त्या परिसरात म्हणावा तसा विकास न झाल्याने तिथे आमरण उपोषण सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी कात्रजमध्ये ठिय्या मांडुन आमरण उपोषण करत होते. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत नागरिकांना हुसकावून लावले आहे.
कात्रज परिसराचा पुणे मनपात समावेश होऊन 25 वर्षे झाली तरी मुलभूत सुविधा आणि विकास होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप होता. यासाठी नरेश बाबर यांच्यासह नागरिकांनी कात्रज परिसरात आंदोलन सुरू केले होते. कात्रज, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील नागरिकही यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला आहे.
महापालिकेत कात्रजचा समावेश होऊन २५ वर्ष लोटली तरी मूलभूत सुविधा व विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ठ ३४ गावांचीही तीच अवस्था आहे. महापालिका प्रशासन व राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत असून न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी नमेश बाबर यांनी कात्रज चौक येथे रविवारपासून आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.