चांदणीचौक ट्राफिक मुक्तीसाठी शिवसेनेचे आंदोलन

शिवसेने उखाडले चांदणी चौकातील बॉरिगेट

कोथरुड : कोथरुडकडे उतरणाऱ्या रोडच्या दुरुस्तीचे व उड्डाणपूलाचे सुरु असलेले काम, मुळशीहून येणारी आणि मुंबईहून येणारी वाहने एकाच वेळी महामार्गावर एकत्रित येणे या कारणामुळे चांदणी चौकात वाहतुक कोंडी होत आहे. त्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला टाकल्या जाणाऱ्या बॉरिगेटमुळेही वाहतूक मंदावत असल्याची सद्यस्थिती आहे. परिणामी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही स्थिती लवकर दूर होऊन चांदणीचौक ट्राफिक मुक्तीसाठी बावधन गावचे मा. सरपंच, शिवसेना उपशहर प्रमुख राहूल दुधाळे यांच्या वतीने बॉरिगेट उखडून आंदोलन करण्यात आले.

चांदणी चौकातील वाहतूकीची परिस्थिती पाहता शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा संबंधित खात्याशी निगडित अधिकार्यांना अनेक वेळा निवेदन दिले व चर्चा केली होती; किंतु अद्यापही प्रश्न कायम असल्यामुळे बावधन शिवसेनेच्या वतीने आज सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राहूल दुधाळे यांच्या सोबत शिवसेना जिल्हा संपर्क संघटीका सौ स्वाती ढमाले, कृषीउत्पन्न बाजार समितीचे अमोल मोकाशी, जेष्ठ शिवसैनिक दिलीप बांदल, शाखा प्रमुख दत्तात्रय दगडे, तुषार दगडे, शंकर दुधाळे, प्रदिप वेडेपाटील, अजित दुधाळे यांच्या सोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

चांदणी चौकातून कोथरूडला जाणारा रस्ता एका आठवड्यात चालू करू असे आश्वासन आंदोलना दरम्यान संबंधित बांधकाम करणारी एनसीसी लिमीटेड या कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या वतीने शशिवसैनिकांना देण्यात आले. जर आठवड्याभरात रस्ता चालू झाला नाही तर मोठे जन आंदोलन उभे करू असा इशारा यावेळी राहूल दुधाळे यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: