ओप्पो एफ21 प्रो, एफ21 प्रो 5जीची 21 एप्रिलपासून विक्री सुरू होणार

नवी दिल्ली :  आघाडीचा जागतिक स्मार्ट उपकरण ब्रँड ओप्पो बहुप्रतिक्षित ओप्पो एफ21 प्रो आणि ओप्पो एफ21 प्रो 5जी या उत्पादनांच्या विक्रीची घोषणा करत आहे. ओप्पो एफ21 प्रोची किंमत रु. 22,900 असून त्याची विक्री 15 एप्रिल 2022 रोजी सुरू होईल आणि रु. 26,999 च्या ओप्पो एफ21 प्रो 5जीची विक्री 21 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. ओप्पो एन्को एअर2 प्रो हादेखील रु. 3,499 या किंमतीला उपलब्ध असेल. रोमांचक लाँच ऑफर्ससह ही उत्पादने महत्त्वाच्या रिटेलर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.

एफ21 आपल्या 32 एमपी फ्लॅगशिप-ग्रेड सोनी आयएमएक्स 709 आरजीबीडब्लू सेल्फी सेन्सरने प्रो व्यावसायिक पोर्ट्रेट फोटोग्राफीचा अनुभव देऊ करतो, त्याच्याबरोबर एआय पोर्ट्रेट एनहान्समेंट, बोके फ्लेअर पोर्ट्रेट आणि सेल्फी एचडीआर यासारखी कल्पक वैशिष्ट्ये मिळतात. हँडसेट 15x/30x मॅग्निफिकेशन देणाऱ्या या प्रकारातील पहिल्या 2 एमपी मायक्रोलेन्सने सुसज्ज आहे. एफ21 प्रोमध्ये मायक्रोलेन्सभोवती घेरणारे इंडस्ट्रीमधील पहिल्या फायबरग्लास-चामडे डिझाईन आणि ऑर्बिट लाईट आहे. सनसेट ऑरेंज आणि कॉस्मिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

एफ21 प्रो 5जीमध्ये 64 एमपी मुख्य कॅमेरा, एक 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, एक 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि एक
2-मेगापिक्सेल मॅक्रो ट्रिपल कॅमेरा युनिट आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल व्ह्यू व्हिडिओ, एआय सीन एनहान्समेंट, बोके फ्लेअर पोर्ट्रेट आणि सेल्फी एचडीआरसारखी वैशिष्ट्येदेखील आहेत. एफ सिरीजमधील हा सर्वात स्लिम 5जी फोन आहे, त्यामध्ये सूक्ष्म चकाकीसह मॅट फिनिशिंग आहे, त्यामुळे सहा रंगांमध्ये इंद्रधनुषी आणि प्रिझमॅटिक परिणाम साधला जातो. हा रेनबो स्पेक्ट्रम आणि कॉस्मिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

त्याच्या जोडीला स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 एसओसी, 128 जीबी रॉम आणि and 8 जीबी रॅम आहे, 5 जीबी अतिरिक्त स्टोअरेज क्षमतेने त्यामध्ये भर घालता येते.

Leave a Reply

%d bloggers like this: