पंचशील नगर येथे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

पुणे : येरवडा भागातील पंचशील नगर येथील पंचशील युवक सेवा संघ व भीम छावा मित्र मंडळ च्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर,  छत्रपती शिवाजी महाराज जयंती , महात्मा ज्योतिबा फुले  यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली, यंनिमित्त विविध कार्यक्रम व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते

.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ८ बाय ८ फूटची रांगोळी गणेश साबळे व पंकज संकपाळ यांनी साकारली . तसेच मंडळाचे जेष्ठ सभासद यांचा सत्कार व लहान मुलांचे व महिलांसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशॊर जाधव , येरवडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख उपस्तिथ होते . डॉ बाबासाहेब जयंती निमित्त भीम छावा मित्र मंडळ ने अन्नदान वाटप केले. यावेळी दोन हजार लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतला.

यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव गंगावणे,आदित्य पाडळे,अखिल भोसले,सागर जगताप, मोहनेश जावळे,सागर भोसले, बबलू खराडे, अनिकेत जाधव, प्रदून्य पाडळे, राहूल पाडळे, आकाश बेल्हे, सागर आवळे, शंकर परदेशी, मनोज कांबळे, आदित्य बेल्हे, कुणाल नाईकनवरे, उमेश नाईकनवरे, सिद्धार्थ शेलार,अकबर सय्यद, बंटी ढोणे, रुपेश चव्हाण, बंटी कदम,सिमॉन साळवे, प्रमोद निकाळजे, संकेत भोसले, राहूल कांबळे, सुनील पवार, अनिल गायकवाड, प्रवीण गंगावणे, महेंद्र नाईकनवरे, निलेश भोसले, कुलदीप भोसले,अक्षय कांबळे, सिद्धार्थ शेलार, बबलू गडकरी, अनिकेत कदम, मयुरेश गमरे यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

%d bloggers like this: