2024 ला आम्ही कोल्हापूरसह सर्व जागा जिकुं -देवेंद्र फडणवीस

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत एन्ट्री केली आहे.त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आम्हाला मिळलेल्या मतावर आम्ही समाधानी आहोत.आम्ही एकटे लढलो ते तिघे लढले तरी आम्हाला तेवढी मत मिळाली. कोल्हापूर निवडणुकीत 2024 ला आम्ही सर्व जागा जिकुं असा विश्वास माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली ते म्हणाले, 5 जून ला मी माझ्या सहकार्‍यांचा आयोध्या ला जाणार आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,
आयोध्याला राज ठाकरे यांना जाणं यात गैर नाही.कोणी प्रभू रामचंद्रांच दर्शन घ्यायला जाऊ शकत. असे देवेंद्र फडणविस म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिवसभर पत्रकार परिषद घेऊन काहीतरी बोलत असतात. त्यावर देवेंद्र फडणविस म्हणाले ,संजय राऊत हे फ्रस्टेड व्यक्ती ते दिवसभर बोलत राहतात. ते मोकळे आहेत .त्यांना काम नाही आम्हला काम आहेत. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

Leave a Reply

%d bloggers like this: