इशरेची नवीन कार्यकारिणी जाहीर; विरेंद्र बोराडे नवीन अध्यक्ष

पुणे: इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग अ‍ॅन्ड एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (इशरे) या संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी वीरेंद्र बोराडे यांची निवड करण्यात आली आहे. इशरे या नामांकित तांत्रिक संघटनेच्या पुणे विभागाच्या नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. नविन कार्यकारिणीमध्ये सचिव चेतन ठाकूर, नियोजित अध्यक्ष नंदकिशोर कोतकर, कोषाध्यक्ष आशुतोष जोशी व इतर सदस्यांचा समावेश झाला.

पदग्रहण कार्यक्रमाला इशरेचे राष्ट्रीय अध्यक्ष एन एस चंद्रसेकर, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध तांत्रिक सल्लागार पंकज धारकर व रिलायन्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रोजेक्ट हेड जी. एस बालाजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इशरे ही राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था आहे. संस्थेमार्फत बरेच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. यामध्ये नर्सरी ते उच्च शिक्षण स्तरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी नियोजन बध्द तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था आहे. तसेच युवा वर्ग आणि महिला यांच्यासाठी उद्योजकता व कौशल्य विकास शिबिर आदी कार्यक्रम घेतले जातात. या संस्थेच्या पुणे विभागाला नुकतीच २९ वर्ष झाले आहे. अमेरिकन संस्था इशरेचे सहा फेलोशीप मिळालेले वरिष्ठ कन्सल्टंट हे भारतातून केवळ पुण्यातच आहेत. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विविध योजना या इशरे संस्थेमार्फत राबविल्या जातात. विविध संशोधनासाठी विद्यार्थांना मानधन सुद्धा या संस्थेमार्फत दिले जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: