Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

बारावा कोथरूड सांस्कृतिक महोत्सव १९ ते २२ एप्रिल दरम्यान रंगणार

पुणे : माजी महापौर  मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे यंदा १२ वे वर्ष आहे. कोरोनाच्या भयंकर काळानंतर पुन्हा आनंदाची लहर घेऊन आलेल्या या महोत्सवात यंदा रसिकांना हास्यकल्लोळदिग्गज कलाकारांद्वारे गानसरस्वती लता मंगेशकर यांची स्मरणयात्रा तसेच तालब्रह्मची प्रचिती घेता येणार आहे.

यंदाचा महोत्सव मंगळवार  दि. १९ ते शुक्रवार २२ एप्रिल २०२२ दरम्यान कोथरूड मधील आयडियल कॉलनी मैदान येथे सायंकाळी साडे सहा वाजता रंगणार आहेअशी माहिती महोत्सवाचे प्रमुख पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संयोजन समिती सदस्य योगेश देशपांडेविनोद सातव आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि. १९)  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार असूनयाच दिवशी ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी यांना ‘संस्कृती कलागौरव पुरस्कार २०२२‘ प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित राहणार आहेत. या दिवसाचा उत्तरार्ध हास्य फुलोऱ्यांनी रंगणार आहे. प्रसिद्ध विनोदी मालिका चला हवा येऊ द्या‘ चे कलाकार यावेळी साधारीकरण करणार आहेत.

दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी (दि. २० व दि. २१) गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत लतादीदी एक स्मरणयात्रा‘ या कार्यक्रमाद्वारे सुरांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून संपूर्ण प्रवासाच्या आठवणी व आठ दशकांतील लता मंगेशकर यांनी गायलेली व स्वरबद्ध केलेली मराठी गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रमाचे सादरकर्ते  डॉ. सलील कुलकर्णी असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरज्येष्ठ गायिका उषा मंगेशकरप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकरसावनी रवींद्रविभावरी आपटेशरयू दातेअनिरुद्ध जोशीप्राजक्ता जोशी-रानडे, प्रियांका बर्वे, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आदी सहभागी होणार आहेत.

महोत्सवाचा समारोप शुक्रवारी (दि. २२) तालब्रह्म‘ या  जुगलबंदीच्या अनोख्या आविष्काराने होणार आहे. यावेळी तालवाद्यांचे जादूगार उस्ताद तौफिक कुरेशीप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्तीप्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसियासतार वादक पुरबायान चॅटर्जी, ज्येष्ठ तबलावादक पं.रामदास पळसुले यांच्या कलांचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading