माझ्या निवडणुकी आधी कार्यकर्ते हनुमान चालीसा म्हणतात पण शक्ती प्रदर्शन करत नाही- जयंत पाटील

पुणे : राज्यात सध्या हनुमान चालिसा विरुद्ध भोंगा असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज हनुमान जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून आरती आणि इफ्तार पार्टी अशा सर्वधर्म समभाव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी “माझ्या मतदारसंघात माझ्या निवडणुकीआधी माझे कार्यकर्ते सर्व हनुमान चालीसा म्हणायचे पण आम्ही शक्ती प्रदर्शन कधी केले नाही”, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या मुस्लीम कार्यकर्त्याने स्वत: आरती केली. अन् त्यानंतर इफ्तार पार्टीसाठी गेले. यावेळी जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमाशि संवाद साधंला.

जयंत पाटील म्हणाले, प्रत्येकाची श्रद्धा, भक्ती ज्याच्यावर आहे त्याच्यावर राहतेच. आम्ही हनुमानाचेही भक्त आहोत, रामाचेही भक्त आहोत. आमच्यामधील हिंदुत्वाचा भाव तो आहेच. याचा अर्थ दुसऱ्या धर्मांचा द्वेष करणं नाही. शाहु, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं शिकवलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात खूप मोठे लढवय्ये मुस्लीम समाजाचे तसेच बारा बलुतेदार होते. ते सर्व छत्रपतींना साध देणारे होते. हे विसरता कामा नये.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जो प्रकार सुरू आहे. त्यांना मागील ३० वर्षे हनुमान चालिसा आठवली नाही, आत्ताच हनुमान चालिसा का आठवली? भाजपा जे सांगतं तो अजेंडा ते राबवत आहेत. यांनी हनुमान चालिसावरून दोन धर्मात द्वेष निर्माण करायचा आणि तिकडून औवेसींनी मुद्दा उचलायचा ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. हे सर्व भाजपा करतंय. म्हणून महाराष्ट्रात कोठेही दंगली होऊ नये जातीय तणाव निर्माण करू नये याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: