अंगावर भगवा शेला अन् मुखात हनुमान चालीसा; राज ठाकरे यांच्या हस्ते मारूती मंदिरात महाआरती   

पुणे : अंगावर भगवा शेला, हातात आरती, मुखात हनुमान चालीसा अन् जय श्रीराम, जय हनुमानच्या जयघोषात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मारूती मंदिरात महाआरतीकरण्यात आली.  यावेळी खालकर चौकात मनसैनिकानी मोठी गर्दी केली होती.

खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात साडे सातच्या सुमारास महाआरती पार पडली. यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारपासून मंदिर परिसरात ढोलताशा, झांज पथक सुरू होते. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजकांकडून राज ठाकरे यांना भगवा शेला आणि गदा देण्यात आली. महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले. यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमूदायाला वाटप ही करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: